माझे मंडळ
roasted - सोम, 2006-12-11 20:06. मराठी ब्लॉग्ज
मराठी ब्लॉग्जचे संकलन, शिवाय बातम्या, हवामान, छोट्या जाहिराती, विवाह, भविष्य, इत्यादि
sampir - बुध, 2007-09-12 20:03. श्रावणसरींबरोबरचे सणवार
श्रावणसरींबरोबरचे सणवार
आषाढ संपतो नि वेध लागतात श्रावणमासाचे. पावसांच्या सरीवर सरी बरसतात आणि वेडं मन गाणही गाऊ लागतं. धरतीची तृष्णा भागविणारा वरूणराजा सर्वांनाच तृप्त करतो. मृदगंध वातावरणात पसरविणारा आणि धरतीला सजविणारा हा अवखळ श्रावण येतो. हिरवागर्द, आल्हाद सृष्टीच्या चराचरात भरून राहतो. हा निसर्गोत्सव सर्वांसाठीच खुला असतो. स्त्रियांची आनंदाने ओंथंबलेली मने त्यांच्या स्वागतासाठी आतुरतेने तयार झालेली असतात. 'श्रावण आला ग वनी, श्रावण आला' हे गीत ओठांवर आल्याशिवाय रहात नाही. तर 'श्रावणमासी, हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे' असे म्हणणारे कवी बालकवी निसर्गाबरोबर पशुपक्षी व स्त्रियांचेही मोहक वर्णन करतात. धरतीवर सगळीकडे हिरवळ पसरलेली असते नि उनपावसाचा खेळही सुरू असतो. हिरवा शालू प्यायलेली धरती पाहून स्त्रियांचे स्वप्नाळू मन संस्कृतीचे पैलू उलगडू लागतात. वसुंधरेबरोबर ती देखील फुलांच्या गजरयाने नटते. दाराबाहेरील रांगोळी मन वेधून घेते.
nayana - मंगळ, 2007-07-31 15:52. अबोल प्रीत
सांग ना मनातूनी काय आज उमटले,
गीत नवे गायीले की साज नवे गुंफीले..
हात हाती घेऊनी काय मनी ठाणीले,
ष्वास ष्वास गुंफीले की बंध नवे बांधीले..
प्रितीच्या फुला तुला काय नवे उमगले,
नयन रात्री जागले की दु:ख त्यात पांगले..
सांग ना कुणी तुझे गुपीत आज जाणीले,
nayana - शुक्र, 2007-07-27 21:30. अबोल प्रीत
सांग ना मनातूनी काय आज उमटले,
गीत नवे गायीले की साज नवे गुंफीले..
हात हाती घेऊनी काय मनी ठाणीले,
ष्वास ष्वास गुंफीले की बंध नवे बांधीले..
प्रितीच्या फुला तुला काय नवे उमगले,
नयन रात्री जागले की दु:ख त्यात पांगले..
सांग ना कुणी तुझे गुपीत आज जाणीले,
nayana - सोम, 2007-07-23 18:08. manasi
Namaskar!!
Manasi ya sadarat aple saharsh swagat...
manat yenarya sundar kalpanna ani vicharanna manasi chya madhyamane apan amurta rup denar ahot..tumhala suchnari ekhdi chashi kavita,lekh,charoli ani tumhala avdlela kahihi tumhi ithe mansichya madhyamane amhala sangu shakta...teva saglyanna sadar amtran detey...
tumchich
nayana
sampir - रवी, 2007-06-03 14:43. रवीवारची सकाळ्
रवीवार्ची सकाळ्.. गमम्मत् जम्मत्.
sampir - शुक्र, 2007-06-01 20:42. ...अन् नानांशी गट्टी जमली
...अन् नानांशी गट्टी जमली - सक्षम कुलकर्णी
मी तिसरी-चौथीत असेन. तेव्हापासूनच नाटक-सिनेमाचं वेड लागलं. सोसायटीच्या, शाळेच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. त्यातूनच हळूहळू मालिका, बालनाट्यं यात भाग घेऊ लागलो. .......
हंगामा चॅनेलसाठी "ओवी' या मालिकेत काम करीत होतो. त्यातील काम पाहून गौतम जोगळेकरांनी "पक् पक् पकाक'च्या स्क्रीनटेस्टला बोलावलं. ग्रामीण ढंगात म्हटलेले संवाद त्यांना खूपच आवडले अन् माझी निवड पक्की झाली. २०० मुलांमधून निवड झाल्याने माझाही आत्मविश्वास वाढला.
sampir - सोम, 2007-05-07 20:23. जुनं ते...
जुनं ते...
"पुरानी चीज से cover नही हटाते हैं, ....जो अच्छा लगे उसे ज्यादा से ज्यादा चलाते हैं,हम हिंदुस्तानी कहलाते हैं"
रेडिओवर जाहिरात लागली होती. भारतीयांच्या 'झिजेपर्यंत वापरा' किंवा 'पुरवून पुरवून वापरा' ह्या मानसिकतेला भावेल असेच उत्पादन होते. जाहिरात गमतीशीर होतीच पण त्याहीपेक्षा त्यात तथ्य होते. मला हसूच आले....
sampir - बुध, 2007-05-02 18:39. मामाच्या गावाला जावुया..!
श्रीकृष्ण नेवसे
सासवड, ता. १ - उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाऊन आनंद लुटण्याची पिढ्या न् पिढ्याची परंपरा..
कधी सुटी लागते अन् गावाला जातोय, असे भाच्यांना होते. मामाचा चिरेबंदी वाडा, केळीच्या बागा, आगीनगाडी, हिरवीगर्द आमराई, चिमुकले दोस्त साद घालतात. गतवर्षीच्या आठवणींनी मन भरून येते आणि मग पाय वळू लागतात ते मामाच्या गावाला जाण्यासाठी. या कथा, कादंबरीतल्या कल्पनांतून तयार झालेले मन उन्हाच्या झळा अंगावर घेत मनसोक्त डोलू लागते. आजीच्या कानगोष्टी ऐकताना रमून जाणारे भाचे पिठुर चांदण्याच्या अंगणात बागडतात. हसतात. खिदळतात. आणि आनंदाने चांदोबाशी दोस्ती करीत झोपी जातात.
roasted - मंगळ, 2007-05-01 13:49. ८७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना विषयी..थोडसं..
कणकवलीत भरलेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरवात जरी अनुदानाच्या वादातून झाली, तरी दोन दिवसांच्या या संमेलनाचा शेवट मात्र आंब्यासारखा गोड झाला. संमेलनाध्यक्षा व सिंधुदुर्गच्या सूनबाई म्हणून गौरव झालेल्या लालन सारंग यांनी अध्यक्षीय भाषणात मांडलेल्या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. दोन दिवसांच्या या नाट्य संमेलनामुळे ऐन उन्हाळ्यात कोकणचा नाट्यमेवा राज्यभर दरवळत राहिला. पालकमंत्री नारायण राणे यांच्याकडेच स्वागताध्यक्षपद असल्याने संमेलनामध्ये बडेजावही होताच; पण नाट्यकर्मींच्या हाती काय लागले, हा प्रश्न जेव्हा डोकावून जातो, तेव्हा उत्तर मिळण्याऐवजी प्रश्नांचे भेंडोळेच तयार होत जाते. संमेलनाध्यक्षा लालन सारंग यांना इतरांच्या तुलनेत अध्यक्षीय कारकीर्द अत्यंत कमी मिळाली आहे, तरीही त्यांनी परखडपणे मांडलेली मते प्रारंभी सर्वांनाच अंतर्मुख करणारी होती. अनुदानाच्या वादावर त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सडेतोड भूमिका घेत नावाजलेल्या नाट्यनिर्मात्यांची कोंडी केली. अनुदानासाठी हात पसरण्यापेक्षा दर्जेदार नाट्यकृती हा त्यांचा मुद्दा निर्विवाद वस्तुस्थिती मांडणारा होता. त्याची प्रचितीही याच नाट्य संमेलनात आली. भल्यामोठ्या सभामंडपात आयोजित केलेल्या परिसंवादाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली. अगदी उद्घाटन सोहळ्यालाही प्रेक्षकांना आवाहन करून बोलावण्यात येत होते. मात्र, याच संमेलनात झालेल्या "मराठी बाणा' आणि "सही रे सही' या नाटकांना तुडुंब गर्दी झाली होती. याचाच अर्थ, दर्जेदार व उत्तम नाट्यकृतींना कुठेही, कशीही गर्दी होतेच; केवळ विचारमंथन करून दिशा दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वांझोट्या चर्चेपेक्षा निखळ मनोरंजन करणारी कलाकृती अधिक जवळ


नवीन प्रतिसाद
1 year 26 आठवडे वेळापूर्वी
1 year 29 आठवडे वेळापूर्वी
1 year 36 आठवडे वेळापूर्वी
1 year 39 आठवडे वेळापूर्वी
1 year 39 आठवडे वेळापूर्वी
1 year 39 आठवडे वेळापूर्वी
1 year 48 आठवडे वेळापूर्वी
1 year 48 आठवडे वेळापूर्वी
1 year 48 आठवडे वेळापूर्वी
1 year 48 आठवडे वेळापूर्वी